पोलीस ठाण्याच्या ‘इन्चार्ज’कडून अपमान झाल्याने सहाय्यक फौजदाराची आत्महत्येची धमकी !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भिंगार कँप पोलीस ठाण्याचे इन्चार्ज असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत व सहाय्यक फौजदार पाठक यांच्यात तक्रार अर्जावरून शाब्दिक खडाजंगी झाली होती. या प्रकारानंतर पाठक यांनी पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनासमोर शिव्या देऊन अपमान केला, असा आरोप करून सहाय्यक फौजदार पाठक यांनी आत्महत्या करीत आहे, अशी पोस्ट ‘व्हाट्सअप’वर टाकली. या धमकीनंतर फाटक यांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. मध्यरात्रीपर्यंत त्यांची समजूत काढण्याचे काम सुरू होते. ही घटना जिल्हा पोलिस दलात चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल झाला होता. या तक्रार अर्जाची चौकशी पाठक यांनी करण्याचा आदेश पोलिस ठाण्याचे ‘इन्चार्ज’ सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत यांनी दिला होता. हा अर्ज माझ्या बीटमधील नाही. त्यामुळे सदर तक्रारीची चौकशी दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याकडे द्यावी, अशी विनंती पाठक यांनी रजपुत यांना केली. परंतु रजपूत पाठक यांनीच चौकशी करण्यावर ठाम होते. त्यावरून रजपूत व पाठक यांच्यात एपीआय रजपूत यांच्या दालनात खडाजंगी झाली. वादानंतर पाठक रात्री त्यांच्या घरी गेले. सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी माझा अपमान केला आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असा धमकीवजा मेसेज त्यांनी व्हाट्सअप वर टाकला.

सदर मेसेज इतर कर्मचाऱ्यांनी पाहिला. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना सदर मेसेजबाबत माहिती देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पोलीस निरीक्षक हारूण मुलाणी, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी पाठक यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मध्यरात्रीपर्यंत त्यांची समजूत काढण्याचे काम सुरू होते. पाठक यांची समजूत काढल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, ही घटना जिल्हा पोलीस दलात चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

आजपासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर ‘या’ आसनांपासून करा सुरुवात 

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम” 

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …! 

गर्भधारने दरम्यान महिलांनी घ्या व्यायामाची अशी ” काळजी ”