Video : पोस्टात नागरिकांच्या रांगा तर कर्मचारी सेलिब्रेशनमध्ये व्यस्त !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – काम नसताना शासकीय कार्यालयात कोणी सेलिब्रेशन करणे समजण्यासारखे आहे. परंतु, कामकाजाच्या वेळेत व समोर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असताना नगरच्या पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी वाढदिवस सेलिब्रेट करीत होते. त्यामुळे नागरिकांना खूप वेळ ताटकळत बसावे लागले. याबाबतचा व्हिडिओ ‘पोलीसनामा’ला प्राप्त झाला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयात नागरिकांची नेहमी गर्दी असते. दोन दिवसापूर्वी येथील एका कर्मचार्‍याचा वाढदिवस होता. हा वाढदिवस जेवणाच्या सुट्टीत किंवा कामकाजाची वेळ आटोपल्यानंतर साजरा करता आला असता. परंतु येथील कर्मचाऱ्यांनी पोस्ट कार्यालयात नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतानाही ऐन कामाच्या वेळेत वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले.

केक कापणे, इतर सेलिब्रेशन, हास्यविनोद यात येथील कर्मचाऱ्यांनी बराच वेळ घातला. त्यामुळे नागरिकांना खूप वेळ ताटकळत बसावे लागले. शासकीय कार्यालये असल्याने काही बोलल्यास उलट सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, या भीतीने नागरिकांनी गप्प राहणेच पसंत केले.

या घटनेचा उपस्थित नागरिकांसह अनेकांनी तीव्र निषेध केला आहे. सदर प्रकाराचा व्हिडिओही ‘पोलीसनामा’ला प्राप्त झाला आहे. याप्रकरणी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’