नगरमध्ये बनावट विदेशी दारूची निर्मिती, शहरात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील केडगाव उपनगर परिसरातील हनुमाननगर येथे बनावट दारूची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. तेथून बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

हनुमान नगर येथील यश मेन्स पार्ललमागे हिंदुस्थान डिस्टीलरीजच्या बाजूला उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने छापा टाकण्यात आला. कैलास तबाजीराव औताडे (वय-२८ वर्ष, रा. हनुमाननगर, नगर) याच्याकडून 1 लाख 2 हजार 902 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मनोज दत्तात्रय रायपल्ली (वय-४५ वर्षे , रा.अतिथी कॉलनी, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर) यास अटक केली. त्याच्या ताब्यातून १३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत एकूण १ हजार १६ हजार १०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

या कारवाईत पोलिसांना बनावट दारुची निर्मिती केली जात असल्याचे आढळून आले. रिकाम्या बाटल्या, प्लास्टीक बुचे, पत्री बुचे, सिलकॅप, तसेच इसेन्स असा जुन्या बाटल्यांचे सिलकॅप तोडण्यासाठी दोन लोखंडी पट्टी एका बाजूने निमुळते व तिक्ष्ण हत्यार, दारु वाहतूककामी एक दुचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई निरीक्षक ए. बी. बनकर, एस. एम. सराफ, कुसळे, सचिन वामने, कर्मचारी बी. बी. तांबट, गदादे, कदम, बडे, वाघ आदींनी ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –