मटकाबुकी कडून परप्रांतीय महिलेवर नोकरीच्या आमिषाने बलात्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयडीसी परिसरातील मटकाबुकी जितेंद्र रमेश पाटोळे (वय 45, रा. शिवाजीनगर, नवनागापूर, ता. नगर) याने नोकरीचे आमिष दाखवून परप्रांतीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपासून त्या महिलेवर कारमध्ये बलात्कार केला जात असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, परप्रांतीय महिलेला नोकरीची गरज होती. मटका बुकी पाटोळे हा तिला ‘तुला कंपनीत नोकरीला लावून देतो’, असे म्हणून घरातून घेऊन जात होता. तपोवन रोड परिसरात नेऊन कारमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. सन 2016 पासून हा प्रकार सुरू होता. अत्याचार केल्याची बाब कोणाला सांगू नये, यासाठी सदर महिला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली जात होती.
याप्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर महिलेच्या फिर्यादीवरून मटकाबुकी जितेंद्र पाटोळे याच्याविरुद्ध बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधोर हे करीत आहेत. पाटोळे हा एमआयडीसी परिसरातील मटकाबुकी आहे.

You might also like