अहमदनगर : आदिवासी महिलेस मारहाण, बलात्कारप्रकरणी माजी महापौरांसह 10 जणांविरूद्ध FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जागेच्या वादातून आदिवासी महिलेस मारहाण करून दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दहा जणांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचा समावेश आहे. ते जुने शिवसैनिक आहेत. माजी महापौरांवर गुन्हा दाखल झाल्याच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी महापौर भगवान फुलसौंदर, गणेश फुलसौंदर, महेश फुलसौंदर, अरुण फुलसौंदर (सर्व रा. बुरुडेमळा, नगर) व त्यांचेसोबत अनोळखी 5 इसमांचा समावेश आहे. याबाबत पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 12 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान बुरुडगाव रोड येथील पडीक रानात आदिवासी समाजातील महिला बकऱ्या चारीत होती. त्यावेळी भगवान फुलसौंदर यांच्यासह इतर लोक तेथे आले. ‘तुला व तुझे कुटुंबियांना आमचे सोबतच जागेचा वाद मिटवायचा आहे की नाही’, असे म्हणून आरोपींनी महिलेस लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली. मारहाणीत सदर महिला अर्धवट बेशुद्ध पडली असता गणेश फुलसौंदर व महेश फुलसौंदर यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. इतरांनी घेराव घातला व त्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यास तुला व तुझे कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी दिली आहे.

याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायदा व बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक अजित पाटील हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like