वाळूतस्कर ‘मुजोर’ बनले ; पोलिसांसमोरून ‘डंपर’ पळविला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांकडून वाळू तस्करांविरुद्ध कारवाई केली जात असतानाच केडगाव येथे पोलिसांसमोरच वाळूचा डंपर पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डंपरचालकाला मदत करणाऱ्या स्काॅर्पिओ चालकाला अटक करून स्काॅर्पिओ वाहन जप्त केले आहे. केडगाव येथील एकनाथनगर परिसरात ही कारवाई केली.

याप्रकरणी निलेश रमेश वैराळ (रा. हिंगणगाव, ता. नगर) यास अटक करण्यात आली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. डंपर वाहनासह अक्षय दौलत पाडळे, अक्षय गोरख पानसरे (दोघे रा. हिंगणगाव, ता. नगर) हे फरार झाले आहेत. केडगाव परिसरातील एकनाथनगर येथून एका डंपरमधून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी डंपर पकडण्याचा प्रयत्न केला. डंपरसह दोन जण पसार झाले. पोलिसांनी एक स्कार्पिओ जप्त करून चालकाला अटक केली आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी भारत इंगळे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. अटक केलेल्या आरोपीला सोमवारी दुपारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा

हवेच्या प्रदुषणामुळे ही होतो अनियमित मासिक पाळीचा त्रास

पहाटे सेक्स केल्याने हार्ट अटॅकचा धोका होतो कमी

सिगारेटच्या धुरामुळे फुफ्फुसासह डोळयांनाही धोका !