शरण मार्केटच्या गाळेधारकांचे पुनर्वसन ! महापौरांचे महासभेत आश्वासन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शरण मार्केट पडल्यामुळे रस्त्यावर आलेल्या गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यात येईल हॉकर्स झोन मंजूर करून त्यांच्या पुनर्वसनाची कार्यवाही दोन महिन्यात करण्यात येईल येईल असे आश्वासन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज महासभेत दिले.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ शरण मार्केटमधील गाळेधारकांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी सर्व नगरसेवक आक्रमक झाले. तसेच प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. महासभेवर बहिष्कार टाकून बाहेर जाण्याची शिवसेनेची भूमिका घेतली होती, तर चर्चा करून त्या गाळेधारकांना न्याय मिळण्यासाठी ठराव करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर यांनी केली. शरण मार्केट पार्थना नगरपालिकेत झालेल्या ठरावाबाबत प्रशासनाने लोकायुक्तांना माहिती दिली नाही. त्यामुळे कारवाई झाली, असा नगरसेवकांचा आरोप होता.

नगरसेवकांची आक्रमक भूमिका पाहून महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शरण मार्केटमधील गाळेधारकांचे पुनर्वसन केले जाईल. दोन महिन्यात ‘हॉकर्स झोन’ जाहीर करून त्यांची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर या विषयावर नगरसेवक शांत झाले.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या