अहमदनगर : शिक्षक संघटनेचा लाक्षणिक संप स्थगित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीने लाक्षणिक संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २० ऑगस्ट रोजी हा संप होणार होता. राज्यातील पूरस्थितीमुळे हा संप आता स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.

माध्यमिक शिक्षक भवन येथे आयोजित सभेत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संप होणार होता. परंतु, राज्यातील पूरस्थितीमुळे हा संप स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सभेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, विजय कराळे, सुदाम दिघे, हनुमंत रायकर, संभाजी चौधरी, योगेश हराळे, बाळासाहेब शिंदे, जॉन सोनवणे, अनंत पवार, नवनाथ घोरपडे, काशिनाथ मते, संजय कऱ्हाड, संजय तमनर, कारभारी आवारे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like