लहान मुलांच्या सतर्कतेने ‘हा’ अनर्थ टळला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दुपारच्या वेळी अपार्टमेंटच्या आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेऊन एकाने पार्किंगमध्ये खेळणाऱ्या लहान मुलांना गोड बोलून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु लहान मुलांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला. मुलांनी तेथून काढता पाय घेत अपार्टमेंटच्या दिशेने धाव घेतली. नगर शहरात काल दुपारी हा प्रकार घडला.

मुलांनी हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांना सांगताच अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यात एक माणूस मुलांशी काहीतरी बोलत असताना मुले पळून जाताना दिसत आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील गुजरगल्ली येथील शितलादेवी अपारमेंटमध्ये काल दुपारी अपार्टमेंट व आसपासच्या परिसरातील सर्व लहान मुले पार्किंगमध्ये खेळत होती. त्या वेळेस एक अनोळखी व्यक्ती आजूबाजूला कोणीही मोठा माणूस दिसत नाही, हे बघून त्या मुलांजवळ गेला. तो मुलांना म्हणाला की, ‘चला माझ्याबरोबर चांदबिबी महालावर. तेथे छान खेळण्या आहेत. मोठे प्राणी आले आहेत. कोणा कोणाला बघायचे. त्यांनी माझा बरोबर चला.’ परंतु, मुलांनी प्रसंगावधान ओळखून ताबडतोब अपार्टमेंटच्या दिशेने धाव घेतली.

लहान मुलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, मुलांनी पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी हा प्रकार ‘सीसीटीव्ही’त पाहिला. मात्र पोलीस ठाण्यांमध्ये याबाब कोणीही तक्रार दिली नाही.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like