CEO माने यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर ; राधाकृष्ण विखे-पाटलांची पालकमंत्री राम शिंदेंवर कुरघोडी ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यावरील अविश्वास ठराव आज सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. सर्व गटनेत्यांनी माने यांच्या कारभाराबद्दल आक्षेप घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांनी ठराव दाखल केला होता. ठरावाला सर्व सदस्यांनी संमती दिली. त्यामुळे हा ठराव एकमताने मंजूर झाला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे यांच्या उपस्थितीत आज विशेष सभा पार पडली. यावेळी सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. माने यांना राज्य शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविलेले असल्याने ते आजच्या सभेस अनुपस्थित होते. हा ठराव पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. या ठरावातून पक्षांतर्गत विरोधक राधाकृष्ण विखे यांनी राम शिंदे यांच्यावर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.

गेल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेमध्ये माजी सैनिकांच्या पत्नीच्या बदलीचा विषय चांगलाच गाजला होता सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष या वेळेला मोठ्या प्रमाणावर उभा ठाकला होता. या बदली प्रकरणावरून चांगलाच वादंग निर्माण झाल्याने अखेरीस जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला होता व त्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयानंतर सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता व त्यांनी सुद्धा सभा त्याग केला होता. यानंतर अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी माने यांच्यावर अविश्वास ठराव आणणार असून त्यासाठी विशेष सभा बोलवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव एकमताने संमत करण्यात आला.

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे