CEO मानेंच्या अविश्वास ठरावावर आज विशेष सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांच्यावर अविश्वास ठरावासाठी आज विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान माने यांना सक्तीच्या रजेवर पाठविलेले असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत ही सभा होणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माने हे पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. त्यामुळे माने यांच्यावर यापूर्वीच अविश्वास ठराव आणण्यासाठी काही सदस्यांनी मागणी केली होती. परंतु विखे कुटुंबीय विरोधी पक्षात असताना बघ्याच्या भूमिकेत होते. माने हे पालकमंत्री शिंदे यांचे विश्वासू आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्य सरकारमध्ये वर्णी लागताच त्यांच्या पत्नी व जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अपंग माजी सैनिकांच्या पत्नीच्या बदलीवरून माने यांना धारेवर धरले. सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून माने यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाची घोषणा केली. अविश्वास ठरावासाठी सदस्यांची विशेष सभा आज आहे. या सभेत विखे त्यांची भूमिका तडीस नेतात की पालकमंत्री प्रा. राम शिंदे हा अविश्वास ठराव बारगळण्यात यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांना राज्य शासनाने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत ही विशेष सभा होत आहे. या सभेत नेमके काय होणार, या निर्णयाकडे प्रशासकीय वर्तुळासह राजकीय क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय