‘लेट’ पण ‘थेट’ एन्ट्री ! कान्समध्ये ऐश्वर्या ठरली ‘या’ अभिनेत्रींना भारी..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रान्स मध्ये चालू असलेल्या ७२ वे कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये दीपिका-प्रियंका यांच्या नंतर ऐश्वर्याने आपली झलक दाखवली आहे. रेड कार्पेट वर जेंव्हा ऐश्वर्याने वॉक केला तेंव्हा सगळेजण तिच्याकडे बघून थक्क झाले. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. ऐश्वर्याच्या आधी दीपिका पादुकोण, प्रियंका चोपड़ा, हुमा कुरैशी, डायना पेंटी, हिना खान आणि मल्लिका शेरावत यांनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला होता. त्यावेळी ऐश्वर्याने पिवळ्या कलरचा आणि ग्रील कलरचा फिशकट गाउन घातला होता. त्या गाउनमध्ये ऐश्वर्या खूप छान दिसून येत होती. तिने केस मोकळे सोडले होते आणि लिपस्टिकलावून तिचा लुक पूर्ण केला. त्यावेळी ऐश्वर्याने गाउनवर कुठल्याही प्रकारची ज्वेलरी घातली नव्हती. तिचा गाउन जीन लुइस सबाजीने बनवला होता.

महत्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या तिच्या मुलीला पुन्हा एकदा कान्स मध्ये घेऊन आली. आराध्याने ऐश्वर्याच्या गाउनला मॅचिंग होणारा पिवळ्या कलरचा ड्रेस घातला आहे. त्यावेळी ऐश्वर्या तिच्या मुलीसोबत मस्ती करतांना दिसून आली होती. ती आराध्याचा हात पकडून तिला गोल फिरवते आहे. मागचा वर्षी ऐश्वर्याचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जेंव्हा ती तिच्या मुलीचा हात धरून कान्स मध्ये आली होती.

ऐश्वर्या २००२ मध्ये पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिवलला आली होती आणि तेंव्हा ती देवदास चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कान्स मध्ये गेली होती आणि तेंव्हापासून ती दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये येते. त्या वेळेस तिच्यासोबत देवदास मधील सह-कलाकार शाहरुख खान आणि संचालक संजय लीला भंसालीसुद्धा एकत्र आले होते. ऐश्वर्या इंटरनॅशनल कॉस्मेटिक प्रोडक्ट लॉरियलला प्रमोट करते. लॉरियल खूप वर्षांपासून कान्सचा ब्यूटी पार्टनर आहे. भारतामध्ये लॉरियलची ब्रॅंड अॅंबेसिडर म्हणून ऐश्वर्या रॉय ओळखली जाते. त्यामुळे ऐश्वर्याला कान्स मध्ये ब्रांड लॉरियल कडून बोलवले जाते. कारण ती तिथे येऊन लॉरियल ब्यूटी प्रोडक्टचा प्रचार करेल.

Loading...
You might also like