अजित’दादां’च्या बैठकीला ‘दांडी’ मारणारे आता ‘रडार’वर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीकडे पाठ फिरविणाऱ्या काही पदाधिकारी व महत्वाच्या कार्यकर्त्यांवर आता ‘वॉच’ ठेवला जाणार असून त्यांची इत्यंभूत माहिती घेण्यात येत असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपमुळे काँग्रेसचे पानिपत झाले ;पण त्याची झळ राष्ट्रवादीलाही बसली. त्यामुळे आगामी काळात राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी अनेकांनी भाजपशी ‘घरोबा’ करण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. त्यासाठी ते आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाकडेही फिरकत नसल्याचे चित्र लोकसभा निवडणुकीनंतर पाहावयास मिळत आहे. त्याचा कटू अनुभव खुद्द अजितदादा पवार यांना घ्यावा लागला.

पुण्यासह पिंपरी -चिंचवडमध्ये गेल्या दोन दिवसापासून हजेरी लावणाऱ्या अजितदादांनी पुण्यासह एक बैठक बोलावली होती, पक्षाच्या या बैठकीचे निरोपही धाडण्यात आले. प्रत्यक्षात जेंव्हा बैठक सुरु झाली ,तेंव्हा पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती अजितदादांना खटकली. तात्काळ अजित पवारांनी ‘लोकं का कमी आहेत’ याची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना विचारली. त्यावर कुणीही बोलण्यास तयार होईना. अखेर कुणी पुण्याबाहेर आहे तर काही जण वैयक्तिक कारणांमुळे बैठकीस येऊ शकले नाही, अशी सारवासारव करण्यात आली. त्यावर ‘पारा’ चढलेल्या अजितदादांनी ‘कोण कुठे आहे, काय करतो’ हे तर पहा; पण बैठकीला का नाही आले, याचा आधी खुलासा घ्या असे स्पष्ट करताना अनुपस्थित असणाऱ्यांची इत्यंभूत माहिती आता ठेवा असे आदेश दिल्याचीच चर्चा आता राष्ट्रवादीच्या गोटात झडत आहे. परिणामी शहर राष्ट्र्वादीतही आगामी पालिका निवडणुकीसाठी राजकीय भवितव्य पाहणाऱ्या इच्छुकांची भाजपच्या डेऱ्यात जाण्यासाठी ‘लगीनघाई’ सुरु झाल्याचे अधोरेखित झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like