असले फितूर ‘वाघ’ असूच शकत नाहीत : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गेले ५ वर्ष एकमेकांना ‘पटकणारे’, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात ! असले फितूर ‘वाघ’ असूच शकत नाहीत. असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून हल्लाबोल केला आहे.

अमित शहा यांच्या प्रचाराला गेलेल्या उद्धव ठाकरे यांना लक्ष करत अजित पवार यांनी हे तर फितूर असून वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही. शिवरायांच्या नावाने मतं मागणं म्हणजे महाराजांचा गौरवशाली इतिहासाचा अपमान असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शनिवारी) गुजरातमधील गांधीनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन हजेरी लावली होती. त्यावरून अजित पवार यांनी ही टिका केली आहे. गेली पाच वर्षे शिवसेना भाजपसोबत सत्तेत असूनही विरोधकाच्या भुमिकेत होती. एकवेळा शिवसेनेने नरेंद्र मोदी तसेच भाजपवर जोरदार टिका केली आहे. मागे विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांचे वर्णन अफजल खानाची फौज असे करून त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याचाच संदर्भ घेत अजित पवार यांनी ट्विटरवरून उद्धव यांच्यावर निशाणा साधला आहे.

 अजित पवार यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘५ वर्ष एकमेकांना ‘पटकणारे’, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात! असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही. शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे.’
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like