एक लाख पाच हजाराची गावठी दारू जप्त, पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (एल.सी.बी.) शाखेच्या पथकाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या उरूळीकांचन बडेकरनगर येथे अवैधपणे गावठी दारूची वाहतुक करणाऱ्या एका आरोपीस मारूती कारसह ताब्यात घेवून १,०५,०००/- रुपयाचा माल जप्त केला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी विस्तृत माहिती दिली.

पुणे जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आदेश दिले आहेत त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर यांच्या पथकाने आज सोमवार दि. २२ जुलै २०१९ रोजी दुपारी लोणीकाळभोर स्टेशन हद्दीत उरुळीकांचन, बडेकरनगर सटवाई चौक ता. हवेली येथे सहजपूर बाजूकडून उरुळीकांचनकडे भरधाव वेगात एक कार येत असून त्यामध्ये गावठी दारू असल्याची माहिती मिळाली यानंतर या मारूती कारचा पाठलाग करून त्या कारला उरुळी कांचन बडेकरनगर सटवाई चौक येथे अडथळा करून चालक आरोपी सकदेव उर्फ सालदेव दुल्हा गुदडावत वय ३८ रा. सहजपूर ता. दौंड जि. पुणे यास मारूती कार नं. एमएच १४ पी ५७३७ सह ताब्यात घेत कारचे पाठीमागील सीट व हौदयामध्ये चेकिंग केली असता त्यामध्ये गावठी दारूने भरलेले ३५ लिटरचे एकूण ४ कॅनमध्ये आढळले हि सर्व दारू विक्री करण्यासाठी वाहतुक करून चालवली होती.

या कारवाईमध्ये अवैध हातभट्टी तयार दारू १४० लिटर, कार इत्यादी सह किं.रू १,०५,०००/- असा माल जप्त करण्यात आलेला असून जप्त मुद्देमाल व आरोपी यास पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. यातील आरोपी हा सराईत असून दुपारचे वेळी वर्दळ कमी असलेने मारूती कारमध्ये लहान मुलास सोबत घेवून गावठी दारूने भरलेले कॅनवर भाजीपाला ठेवत असल्याने त्याचा कोणालाही संशय येत नसायचा.

आरोग्यविषयक वृत्त –