महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याची निवडणूक पुढे ढकला ; निवडणूक आयोगाकडे मागणी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – मतदानाला दोन दिवस उरले असतांनाच अमरावती जिल्ह्याची निवडणूक पुढे ढकला अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. या मागणी कडे निवडणूक आयोग काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अ‍ॅड. सिद्धार्थ गायकवाड यांनी ही मागणी केली आहे.

११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. विशेष म्हणजे अमरावती लोकसभा मतदार संघाचे येत्या १८ तारखेला मतदान होणार आहे. याचदरम्यान, अमरावतीमधील लोकसभा निवडणूक पुढे ढकला अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. येत्या २२ तारखेला आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या जात वैधतेच्या संदर्भात निर्णय होणार आहे. त्यामुळे केवळ अमरावती जिल्ह्याची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.

मतदानाला केवळ दोन दिवस बाकी आहेत. नवनीत राणा यांनी जोरदार प्रचारही केला आहे. मात्र निवडणूक पुढे ढकलण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.