पोलिस अधीक्षक आनंद भोईटेंना ‘त्या’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्याचे दोषारोपत्र तयार करताना बनावट पुरावे तयार केल्याप्रकरणी पोलिस संशोधन विभागाचे (पुणे) पोलीस अधीक्षक आनंद भाेईटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला होता. त्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक भोईटे यांना दिलासा मिळाला आहे.

निघोज हत्याकांडाच्या गुन्ह्यात बनावट कागदपत्रे व पुरावे तयार केल्याप्रकरणी या गुन्ह्यात आरोपी असलेल्या बबन कवाद यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 2018 रोजी क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती नलावडे व न्यायमूर्ती सोनवणे यांच्यासमोर सुनावणी झाली. तपासी अधिकारी असलेल्या भोईटे यांनी बनावट पुरावे तयार केले, असा आरोप याचिकाकर्ता बबन कवाद यांनी केला होता. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने भोईटे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 167 अन्वये गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.

या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सकाळी सुनावणी झाली. त्या सुनावणीत न्यायालयाने भोईटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like