जामिन झाल्यानंतरही शिवसेना उपनेते अनिल राठोड उद्यापर्यंत न्यायालयीन कोठडीतच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना उद्यापर्यंत न्यायालयीन कोठडी राहावे लागणार आहे. जामीन मंजूर झाल्याचा आदेश निघाला. मात्र इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ न शकली नसल्याने त्यांचा मुक्काम उद्यापर्यंत लांबला आहे.

महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट भिरकविल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या राठोड यांना काल सायंकाळी जिल्हा व सत्र न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या ऐपत प्रमाणपत्रावर जामीन मंजूर केला आहे. परंतु उशिरा झालेल्या आदेशामुळे जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. म्हणून राठोड यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे. काल सायंकाळी उशिरा झालेला आदेश व आजची सुट्टी असल्यामुळे जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

राठोड यांची बीपी व शुगर वाढल्यामुळे त्यांच्यावर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिस बंदोबस्तात ते वैद्यकीय उपचार घेत आहेत. काल जामीन मंजूर झाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी त्यांची भेट घेतली.

आरोग्यविषयक वृत्त –