साखर कारखाने विक्रीत 25 हजार कोटींचा घोटाळा : अण्णा हजारे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणाची चौकशी, तसेच राज्य सहकारी बँकेतील नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणाच्या गुन्ह्याचा तपासही ज‌ळगावच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणाप्रमाणे व्हावा. ही प्रकरणे प्रामाणिक अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावीत, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

राज्य सहकारी बँकेमार्फत कर्जवाटपप्रकरणी तत्कालीन संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात अनेक बड्या राजकारण्यांची नावे आहेत. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झालेला आहे. त्या घोटाळ्यांमध्ये अनेक बडे राजकीय नेते अडकले आहेत. जळगाव घरकुल घोटाळ्यातील व्यवस्थित तपास होऊन ज्या पद्धतीने आरोपींना शिक्षा झाली, त्याच पद्धतीने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीचा गुन्हा दाखल करून तपास केला पाहिजे. तसा तपास केल्यास राज्यातील अनेक भ्रष्ट राजकारणी त्यात अडकतील.

अण्णा पहिल्यांदाच सत्कारासाठी एसपी कार्यालयात –

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नगरचे पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांची त्यांच्या कार्यालयात येऊन भेट घेतली व एक गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. सिंधू यांनी जळगाव घरकुल घोटाळ्याचा तपास केलेला आहे. त्यांच्या व्यवस्थित तपासामुळे आरोपींना शिक्षा झाल्याने अण्णा यांनी त्यांचा सत्कार केला. नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात हजारे यांनी पहिल्यांदाच येऊन एसपींचा गौरव केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या

देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी

नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार

काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत

कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्‍या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर