धार्मिक स्थळांसाठी आंदोलन करणाऱ्या महिला संघटना आता कुठे गेल्या ? : अनुराधा पौडवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – धार्मिक स्थळी महिलांसाठी आंदोलन करणाऱ्या महिला संघटनांच्या नेत्या, महिला अत्याचारांच्या घटनांच्यावेळी कोठे जातात? महिलांना जिवंत जाळले जात असताना त्या महिला नेत्या गप्प का, असा सवाल प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केला.

पौडवाल यांनी आज शनिशिंगणापूर येथे येऊन शनिदर्शन घेतले. चौथऱ्यावर न जाता खालूनच दर्शन घेतले. त्यानंतर शनिदेवाला अभिषेक केला. पौडवाल यांनी शनिदेवाला भाऊ मानले आहे.

पौडवाल म्हणाल्या की, शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले. चौथऱ्यावर चार पायऱ्या चढून जाण्यासाठी अट्टहास धरणाऱ्या महिला संघटना आज काय करत आहेत? देशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा परिस्थितीत या महिला नेत्या गप्प का आहेत? त्या तेथे जाऊन आवाज का उठवत नाहीत? त्यांना काहीच कसे वाटत नाही? महिला नेत्या केवळ धार्मिक स्थळी आंदोलन करतात. प्रसिद्धी मिळवतात. चार उंबरे ओलांडले म्हणजे महिलांचे प्रश्न सुटले असे नाही. खरी गगज महिलांवरील अत्याचार रोखणे, त्यांना सुरक्षा देण्याची आहे.

फेसबुक पेज ला लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like