सांगली : शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कवठेमहांकाळ येथे धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पंकज राजाराम लोंढे (वय 23, रा. इटकरवाडी, कोंगनोळी) व ज्ञानू आण्णासाहेब खोत (वय 19, रा. खोत वस्ती, पांडेगाव, कोगनोंळी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चार धारदार शस्त्रे जप्त केली.

बेकायदा शस्त्रे घेऊन फिणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे एक पथक कवठेमहांकाळ परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी कवठेमहांकाळ येथील न्यु फेमस चिकन सेंटर समोर दोघांकडे धारदार शस्त्रे असल्याबाबत माहिती निरीक्षक पिंगळे यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई चे आदेश दिले. पथकाने छापा टाकून पंकज लोंढे व ज्ञानू खोत या दोन तरुणाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या कमरेला लहान मोठे, अशी चार धारदार शस्त्रे मिळाले. या दोघांविरुध्द कवठेमहाकांळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.