सराईत गुन्हेगार पिस्टलसह पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सराईत गुन्हेगाराला अटक करून दोन पिस्टल आणि काडतुसे गुन्हे शाखेच्या युनिट २ ने जप्त करून गुन्हेगाराला अटक केली आहे. ही कारवाई पुणे बोटक्लब येथे करण्यात आली आहे. दत्ता नंदलाल शर्मा उर्फ चिन्या (वय-३० रा. रामनगर, बोपखेल) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

हद्दीतील रेकॉर्डवरील आणि फरार आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट -२ चे पोलीस नाईक मॅगी जाधव यांना सराईत गुन्हेगार दत्ता शर्मा हा बोटक्लब येथे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे ३० हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्टल आणि २५ हजार रुपये किंमतीची रिव्हॉल्वर आणि चार काडतुसे आढळून आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेला आरोपी शर्मा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खडकी आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस कर्मचारी अनिल ऊसुलकर, यशवंत आंब्रे, दिनेश गडांकुश, अस्लम पठाण, मॅगी जाधव, गोपाळ मदने यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त