मुळ्येंची चित्रे ‘जहांगीर’मध्ये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरीतील प्रख्यात चित्रकार रवींद्र मुळ्ये यांच्या निसर्गचित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन सुरू झाले आहे. ‘वाईब्ज ऑफ नेचर’ या विषयावरील सुमारे २८ चित्र या प्रदर्शनात पहायला मिळत आहेत.

काला घोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये रत्नागिरीतील प्रख्यात चित्रकार रवींद्र मुळ्ये यांच्या चित्र प्रदर्शनाला चार जून पासून सुरुवात झालेली आहे. ‘वाईब्ज ऑफ नेचर’ अशी थीम असणाऱ्या या प्रदर्शनात कॅनव्हासवर ऍक्रेलिक कलर मध्ये चितारलेली २८ चित्रे पाहायला मिळत आहेत. दोन बाय दोन फुटावरून चार बाय तीन फुटांपर्यंत रेखाटण्यात आलेल्या या चित्रांमध्ये निसर्गात होणाऱ्या बदलांच्या छटा रवींद्र मुळ्ये यांनी रेखाटलेल्या आहेत.

४ जून ते १० जून या कालावधीत हे प्रदर्शन असून हे प्रदर्शन पाहायला कलाप्रेमींनी मोठी गर्दी केलेली आहे.