…म्हणून अरुण जेटली भाजपच्या ऐतिहासीक विजयानंतर ‘दिसले’च नाहीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशामध्ये भाजपने स्पष्ट बहूमत मिळवलं असून दुस-यांदा सत्ता स्थापन करणार आहे. स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतर भाजपाने शनिवारी सेंट्रल हॉलमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते, विविध राज्यांचे पदाधाकारी आणि नवनियुक्त खासदार यांची बैठक बोलवली होती. या बैठकीला एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. मात्र, यामध्ये अरुण जेटली कुठेच दिसले नाहीत. अरुण जेटली यांची प्रकृती ठिक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, असे समजते.

भाजपाने देशात ऐतिहासीक विजय मिळवल्यानंतर शनिवारी सेट्रल हॉलमध्ये नरेद्र मोदी यांनी नवनियुक्त खासदारांना संबोधीत केले. मात्र, यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली कुठेच दिसले नाही. त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते येऊ शकले नसले तरी ते ट्विटर अकाऊंटवर शुक्रवारपर्यंत (दि.२४) सक्रीय होते. मात्र, शनिवार आणि रविवारी त्यांच्या अकांऊटवर सक्रिय दिसत नाहीत.
अरुण जेटली यांनी शेवटेचे ट्विट सुरत येथील अग्नितांडवात मृत्यू झालेल्यांविषयी केले आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना देव लवकर बरे करो अशी प्रर्थना केली आहे. या ट्विटनंतर त्यांनी कोणतेही ट्विट केले नाही.

भाजपाने देशात ऐतिहासीक विजय प्राप्त करत ३०३ जागा जिंकल्या तर एनडीएने ३५२ जागा जिंकल्या आहेत. एनडीएकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाच्या उमेदवारीला संम्मती देण्यात आली आहे. काल सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, अकली दलाचे प्रमुख प्रकाश सिंह बादल, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, सुषमा स्वराज आदी उपस्थित होते. मात्र यामध्ये कमी जाणवली ती अरुण जेटली यांची.

ऐतिहासीक विजयानंतर अरुण जेटली कुठल्या चॅनलवरदेखील प्रतिक्रीया देताना दिसुन आले नाहीत. यावरुन त्यांची प्रकृती उत्तम नसल्याची चर्चा आहे.