अशोक चव्हाणांच्या पराभवामागे राष्ट्रवादीची ‘दगाबाजी’ : अमिता चव्हाण

नांदेड : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पराभवामागे राष्ट्रवादीकडून झालेला दगाफटका कारणीभूत असल्याचा आरोप भोकरच्या आमदार अमिता चव्हाण यांनी केला आहे.

नांदेड जिल्ह्यात कधीही जातीपातीचे राजकारण न करणाऱ्या अशोक चव्हाण आणि काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला साथ दिलेली आहे;पण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांवर अंकुशच नव्हता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी एकीची मोट बांधण्याचे आवाहनही आमदार अमिता चव्हाण यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उघडपणे भाजपचे काम करत होते. राष्ट्रवादीच्या दगाबाजी केल्यामुळे चव्हाण पराभूत झाले एकप्रकारे राष्ट्रवादीने काँग्रेसचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही त्यांनी केला .विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्र्वादीबाबत ही भूमिका मांडताना गेल्या निवडणुकीत झाले गेले आता विसरून जावे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीसाठी एकत्रपणे कामाला लागावे. त्याद्वारे पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवून द्यावा, असे आवाहन अमिता चव्हाण यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like