सहायक पोलीस निरीक्षक (API) प्रेमा पाटील ठरल्या ‘रिनिंग मिसेस इंडिया २०१९’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील यांनी रिनिंग मिसेस इंडिया २०१९ हा किताब पटकावला आहे. सौंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करत त्यांनी हा किताब पटकावला.

prema-patil

मोनिका शेख यांनी रिनिंग मिसेस इंडिया २०१९ ही सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. बाणेर येथील ऑर्कि़ड हॉटेल येथे या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. प्रेमा पाटील या मुळच्या कराड येथील असून त्यांनी एम. कॉम पर्यंत शिक्षण घेतले आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मागील ९ वर्षांपासून त्या पोलीस अधिकारी म्हणून काम करत असून सध्या त्या पुणे शहर पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत आहेत. या व्यतिरीक्त कार्बाेनरी या सामाजिक संस्थेशी सलग्न असून संस्थेकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक कामामध्ये त्या सहभागी असतात. पुण्यातील व पुण्याच्या जवळपास असलेल्या गावातील गरजु गरीब मुलांना शिकविण्याचे ही काम त्या करतात.

जी २० समिट वरचे प्रेझेंटेशन, नृत्य आणि हजरजबाबीपणा यामुळे त्या स्पर्धेमध्ये सर्वाेत्कृष्ट ठरल्या. परेड मार्च ते रॅम्प वॉक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

You might also like