‘बालगंधर्व रंगमंदिर आणि माझं एक वेगळं नातं : सुप्रसिद्ध अभिनेते अशोक समर्थ

पुणे: पोलीसनामा ऑ ‘बालगंधर्व रंगमंदिर आणि माझं एक वेगळं नातं आहे. मी आज खरोखर भावुक झालो आहे. इथे मी नाटकांच्या पाट्या वाचायचो व त्याकाळी निश्चय करुन काम करु लागलो आणि अभिनेता झालो. आज त्याच बालगंधर्व रंगमंदिरामध्ये बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजा महोत्सव प्रबोधन दिवाळी पहाटसाठी पाहुणा म्हणून आलो व आपणा सर्वांशी दिवाळीच्या शुभदिनी संवाद साधता येतोय याचा मला आनंद वाटतो.’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते अशोक समर्थ यांनी शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन आयोजित ‘बळीराजा महोत्सव…’ प्रबोधन दिवाळी पहाट कार्यक्रमात बालगंधर्व रंगमंदिर येथे केले. यंदाचे हे सलग ७ वे वर्ष होते.
 Ashok Samarth

‘स्वशिष्टाचाराच्या भूमिका व जाणिवा आपण जोवर बाळगत नाही तोवर चांगला समाज घडेल असे वाटत नाही. स्वशिष्टाचाराची पाळंमुळ ही संत तुकारामांच्या काळात रुजली गेली होती व आज या महोत्सवात ‘अभंग रिपोस्ट’ या बँडमुळे अनुभवता आली याचा मला आनंद वाटतो’, असेही अशोक समर्थ पुढे म्हणाले. याप्रसंगी शिवस्पर्श दिवाळी अंकाचे प्रकाशन अशोक समर्थ यांच्या यांच्या शुभहस्ते तर अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी संमेलनध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, श्री ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार ह. भ. प. राजाभाऊ चोपदार, श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूरच्या विश्वस्त अ‍ॅड. माधवी निगडे, पुणे मनपाचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड व शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अ‍ॅड. शैलजा मोळक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

संत तुकारामांच्या अभंगांचे दाखले देत अशोक समर्थ म्हणाले, ‘घरच्या सफाईत जशी जळमट काढली जातात तसेच मनाची जळमट काढत सर्व षड़रिपुंवर मात करत पुढे जायला हवे.’ याप्रसंगी लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘बळीराजा महोत्सवात यंदा ‘अभंग रिपोस्ट’ हा कार्यक्रम संत विचारांना तरुणांना जोडणारा आहे. मनाची स्वच्छता करण्यासाठी संत विचार आवश्यक, विज्ञाननिष्ठ व मानवतावादी होयचे असेल तर संतांची परंपरा सांगितली पाहिजे. बळीराजा संकटात आहे. शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी संतांचे कार्य तळागाळात पोहोचले पाहिजे.’

Ashok Samarth

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी केले. तसेच राजाभाऊ चोपदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते संजयशिंह शिरोळे व दलित चळवळीचे कार्यकर्ते निलेश कांबळे यांना ‘चळवळीतील अवलिया’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘अभंग रिपोस्ट’ या कार्यक्रमातून संतांचे अभंग नव्या रुपात यावेळी सदर करण्यात आले. नवीन चाली, नवीन ठेके व नव्या ढंगात तरुणांपर्यंत हे संतांचे विचार पोहोचावे या भावनेतून ते गाण्यात आले व या अभंगांचा लोकांनी मनसोक्त सर्व रसिकांनी लुटला. ही दिवाळी पहाट संत विचारांची व मानवतेची होती असे सर्वांचे मत आले. ‘इडा पिडा टळो | बळीचे राज्य येवो |’ अशी भावना जमलेल्या लोकांनी व्यक्त केली. संपूर्ण बालगंधर्व रंगमंदिर शेतीशी निगडीत गोष्टींशी प्रातिनिधिक स्वरुपात सजवले होते. भाजी पाला, धान्य व विठ्ठल – बळीराजाचे पूजन करून हा दिवस साजरा झाला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे सचिव प्रज्ञेश मोळक यांनी केले.

Visit : Policenama.com