फडणवीस सरकारचा दुजाभाव ? मुंडेंच्या स्मारकासाठी 50 तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी दहाच कोटी !

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – औरंगाबाद महापालिकेत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विकसित करण्यासाठी ६४ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्याची परवानगी दिली आहे. मात्र आता यामध्ये राज्य शासनाने महापालिकेला आदेश देऊन हे स्मारक १० कोटी रुपयांमध्येच बांधण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंढे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. मात्र मुंढे यांच्या स्मारकासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात तरतूद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मात्र १० कोटी रुपयांची तरतूद केल्याने महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक अचंबित झाले आहेत.

या स्मारकासाठी आधी पालकमंत्री रामदास कदम यांनी पाच कोटी रुपयांच्या निधीची घोषणा देखील केली होती. त्याचबरोबर महापालिकेने राज्य सरकारकडे यासाठी निधीची मागणी केली होती. मात्र तिजोरीत पैसे नसून देखील महापालिकेने ६४ कोटी रुपयांची निविदा देखील काढली. मात्र या निविदेला फक्त दोन कंत्राटदारांनीच प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतर महापालिकेने राज्य सरकारला यासाठी निधी देण्याची विनंती केली. त्यानुसार पत्र देखील पाठवण्यात आले. मात्र याला प्रतिसाद देताना सरकारने हे स्मारक दहा कोटी रुपयांमध्येच करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, भाजपा सरकारच्या या भूमिकेमुळे महापालिका बुचकळ्यात पडली असून एका बाजूला गोपीनाथ मुंढे यांच्या स्मारकासाठी ५० कोटी रुपये मंजूर करत असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी फक्त १० कोटी रुपये मंजूर झाल्याने राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –