कट्टर प्रतिस्पर्धी थोरात-विखेंची ‘शेजारी-शेजारी’ बसून ‘विमानवारी’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्वी एकाच पक्षात असूनही अंतर्गत विरोधक असलेले व आता विरोधी पक्षातून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात व भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे हे एकाच विमानात शेजारी-शेजारी बसून आज सकाळी दिल्लीला गेले. विशेष म्हणजे जाताना त्यांनी गप्पाही मारल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

शिर्डी येथून दिल्लीला जाणाऱ्या स्पाईस जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही शेजारी शेजारीच जागा मिळाली. सकाळी साडेदहा वाजता हे विमान शिर्डी येथून रवाना झाले. अधिवेशनाची दोन दिवसांची सुट्टी संपल्यानंतर खासदार विखे पुन्हा दिल्लीला अधिवेशनासाठी निघाले होते. तर थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तेही वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीला निघाले होते.

थोरात-विखे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पूर्वी एकाच पक्षात असूनही त्यांच्यात विविध मुद्यांवरुन नेहमी राजकीय वाद होत. राजकीय वर्चस्वावरुन दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील वाद राज्याला परिचित आहे. विखे यांनी थोरातांच्या संगमनेर मतदारसंघात कमळ फुलविण्याची घोषणा केली, तर राधाकृष्ण विखे यांनीही जिल्ह्यात १२-० करण्याची जबाबदारीही सुजय यांच्यावर टाकली आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी थोरात यांचीच निवड झाल्यामुळे विखे – थोरात यांच्यातील वाद अधिक तीव्र होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. त्यातच दोघांनी आज एकत्र प्रवास केलेला फोटो सोशल मीडिया व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या