‘पाक’मधील बलूचिस्तानच्या नेत्यांनी ‘खुलेआम’ सांगितलं, नरेंद्र मोदी आमचे ‘हिरो’, ‘स्वातंत्र्य’ मिळाल्यास पहिली ‘मुर्ती’ त्यांचीच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बलुचिस्तानच्या नेता नायला कादरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी नरेंद्र मोदी यांना ‘हिरो’ म्हणून संबोधले आहे. त्या म्हणाल्या पाकिस्तान चीन सोबत मिळून बलुचिस्तानला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, पाकिस्तान बलूच लोकांचा नरसंहार करत आहे. कादरी पुढे म्हणाल्या, जर बलुचिस्तान स्वतंत्र झाला तर आम्ही नरेंद्र मोदींची एक प्रतिमा उभी करू, कारण मोदी आमचे हिरो आहेत.

मोदींनी ज्या धाडसाने पाकिस्तानबाबत निर्णय घेतला आहे त्याविरोधात जगात कोणताही नेता बोललेला नाही. पाकिस्तान ७० वर्षांपासून आमच्यावर अन्याय करत आहे परंतु आमचे हिरो मात्र मोदीजींच आहेत.
नायला यांनी स्पष्ट मत मांडले की, जर भारताने स्वतंत्र होण्यामध्ये आम्हाला मदत केली तर त्याचे दूरगामी फायदे होतील. एक तर भारत आपल्या संस्कृती प्रमाणे मदतगारची भूमिका पार पाडेल आणि दुसरे म्हणजे बलुचिस्तान भारताला ऊर्जाच्या क्षेत्रामध्ये मदत करेल. हिंगलाज मातेच्या दर्शनासाठी भारतीयांना व्हिजाची सुद्धा गरज पडणार नाही.

नायला यांनी थेट पाकिस्तानवर वक्तव्य करत सांगितले की, पाकिस्तान हा इस्लामचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण पाकिस्तान इस्लामच्या नावावर दहशतवाद वाढवत आहे. आतापर्यंत ३० लाख बंगाली मुसलमान, ४० लाख अफगाणी मुसलमान, आणि कित्येक हजार बलुचिनची हत्या केली आहे. असे अनेक आरोप नायला यांनी पाकिस्तानवर केले.

आरोग्यविषयक वृत्त –