विधिसंघर्षग्रस्त बालक व पालकांसाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात मिटींगचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडी पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक 21 मे 2019 रोजी सायंकाळी 6.00 सुमारास भरोसा सेल व लाईफ स्कूल फाउंडेशनच्या संयोगाने विधिसंघर्षग्रस्त बालक व पालकांच्या मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मिटिंग मध्ये पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सुरु केलेल्या भरोसा सेल पोलीस आयुक्तालय कार्यालय पुणे मार्फत विधीसंघर्षग्रस्त बालक, बालकांचे पालक व पिडीत मुलांना मानसिक बळ व आधार, बालकांचे पुनर्वसन, पिडीत बालकांना वैदयकिय सेवा, मानसोपचार तज्ञ, विधीतज्ञ संरक्षण अधिकरी उपलब्ध करुन देणे. बालकांना गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करणे व चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 ची माहिती देण्यात आली.

लाईफ स्कुल फांऊडेशनचे अजित वरदे यांनी विधीसंघर्षग्रस्त बालक व पालकनां संबोधीत करताना. गुन्हेगारी व व्यसनांमुळे भविष्यात होणा­या दुषपरिणामाबाबत माहिती देत पालकांनी बालकांना वारंवार समपुदेश करुन गुन्हेगारी पासून बालकांना कशा प्रकरे दुर ठेवाता येईल तसेच बालक हक्काचे संरक्षण करणे याविषयी मार्गदर्शन केले.

सामाजिक स्तरावर विधिसंघर्षग्रस्त बालसंरक्षणाला बळकटी देण्यासाठी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, विधिसंघर्षग्रस्त बालकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवणाऱ्या सर्व शासकीय निमशासकीय व सामाजिक संस्थांची बालकांना सुविधा पुरवण्यासाठी समन्वय साधणे, विधिसंघर्षग्रस्त बालकांचे पुनर्वसन याबाबत जनजागृती करून त्यांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणून सामाजिक जीवनात योग्य नागरिक बनवणे हे “भरोसा सेल” चे मुख्य उद्देश आहे. असे प्रतिपादन पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष सुरक्षा बालपथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भोर यांनी सांगितले.

14 ते 17 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. त्यांच्या मध्ये होणारे बदल ते व्यक्त करु शकत. त्यामुळे अशी मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. त्यांच्याकडून नकळत गुन्हे घडतात ज्याची त्यांना जाणीवही नसते. गुन्हा घडल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की तो गुन्हा आहे. मुलांना गुन्ह्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी प्रतिबंध करण्यासाठी शिक्षक, पालक वर्ग व समाजातील प्रत्येक नागरिकांनी प्रतिबंध करावा. विधिसंघर्षग्रस्त बालकांचे समाजात पुनर्वसन करणे भरोसा सेलचा मुख्य उद्देश आहे. असे प्रतिपादन बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी केले.

सदर कार्यक्रमास बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, महिला पोलीस उप निरीक्षक निंबाळकर, लाईफ स्कुल फांऊडेशनचे सदस्य पंकज पिपाडा, अमित वदरे, पंकज मानदाने, 30 ते 35 विधीसंघर्षग्रस्त बालक व पालक,पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष सुरक्षा बालपथकाचे अधिकारी पो.उप-निरीक्षक बाळासाहेब भोर, भरोसा सेलचे कर्मचारी, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार तणपुरे,पोलीस नाईक दुधाने असे उपस्थित होते.

Loading...
You might also like