बीड मतदारसंघात MIM च्या उमेदवाराचा झंझावात, पतंगाची दोर मतदारांच्या हाती

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या २० वर्षांपासुन समाजकार्याच्या माध्यमातुन सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना न्याय देण्याचे आणि प्रत्येकवेळी जात-पात न पाहता भाऊ म्हणुन उभे राहण्याची भुमिका शफीक शेख यांना फायद्याची ठरू लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासुन शफीक शेख यांचा झंझावात मतदारसंघात सुरू आहे. भाऊ, तुम्ही आमचेच आहात असे म्हणत मतदारांनीच पतंगाची दोर हाती घेतली आहे.

बीड विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अ‍ॅड. शेख शफीक यांच्या प्रचारार्थ खा.ओवेसी यांची सभा झाल्यानंतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. गट-तट आणि जुने-नवखे विसरून प्रत्येकजण शेख शफीक यांच्या विजयासाठी मेहनत घेवु लागला आहे. शेख शफीक यांनी मतदारसंघात दौरे करत डोअर-टु-डोअर प्रचार सुरू केला आहे. सर्वसामान्यांचा भाऊ म्हणुन मतदारांनीही त्यांच्या विजयाचा निर्धार करत आता पतंगाची दोर आमच्या हाती असल्याने विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास शेख शफीक यांना दिला आहे.

 

visit : Policenama.com