Advt.

भोसरी मतदार संघासाठी लांडगे, लांडे, साने यांच्यासह 21 जणांनी नेला उमेदवारी अर्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज नेला आहे. तर, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज नेला आहे.

माजी आमदार, राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज नेला आहे. भोसरी मतदार संघासाठी 21 जणानी उमेदवारी अर्ज नेले आहेत.

भाजपकडून सहयोगी आमदार महेश किसन लांडगे यांनी चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीपासून लांब राहणा-या विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून तीन उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. लांडे अपक्ष लढण्याची शक्यता असल्याने भोसरी मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत.

राष्ट्रवादीकडून माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यांच्यासह शांताराम भालेकर यांनीही राष्ट्रवादीकडून अर्ज नेले आहेत. आजपर्यंत एकूण 21 जणांनी 51 अर्ज नेले आहेत.

 

Visit : Policenama.com