home page top 1

अपक्ष आमदाराचा ‘इतिहास’ भोसरीत कायम राहणार ? नात्यागोत्यातील ‘आजी-माजी’ आमदारांत लक्षवेधी लढत

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाइन – भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे विद्यमान आमदार महेश लांडगे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत माजी आमदार विलास लांडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. नात्यागोत्यातील आजी-माजी आमदारांमध्ये लक्षवेधी लढत होत आहे. मामा विरुद्ध भाचे-जावाई यांच्यात होत असलेल्या चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून या ठिकाणी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भोसरीकर अपक्ष उमेदवाराला निवडून देण्याचा इतिहास कायम राखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपचे उमेदवार महेशदादा लांडगे हे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार व भोसरीचे पहिले आमदार विलास लांडे यांचे भाचे जावाई आहेत. मागच्या निवडणुकीत हे दोघे रिंगणात उतरले होते. त्यावेळी अपक्ष महेश लांडगे यांनी बाजी मारली होती. त्यावेळी दोघांमध्ये काटे की टक्कर झाली होती. यंदाच्या निवडणुकीत विलास लांडे हे अपक्ष असून भोसरीकर अपक्ष आमदार देण्याची आगळी हॅटट्रीक करणार का याकडे औद्योगिक नगरीचे लक्ष लागून राहिले आहे.

हवेली तालुक्याचे विभाजन झाल्यानंतर पुनर्रचनेत शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने लांडे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात अपक्ष महेश लांडगे रिंगणात होते. यामध्ये लांडगे यांनी लांडे यांच्यासह शिवसेनेच्या उबाळे, भारतीय जनता पक्षाचे एकनाथ पवार यांचा पराभव केला. आत्ताच्या निवडणुकीत लांडगे विरुद्ध लांडे अशी सरळ लढत आहे.

Visit : Policenama.com

 

Loading...
You might also like