भाजपच्या ‘या’ उमेदवाराचे निकालापूर्वीच ‘पर्मनंट आमदार’ असे फलक, राजकीय वर्तूळात खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी सर्वत्र दि. 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले तर दि. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र, भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे आजच (बुधवार) अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत. त्यावर त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असून पर्मनंट आमदार असा उल्लेख करण्यात आला असल्याने राजकिय वर्तूळात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

लावण्यात आलेल्या फ्लेक्सबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. राज्यातील काही ठिकाणी मतदान झाल्यानंतर अनेक उत्साही उमेदवारांनी विजयी मिरवणूका देखील काढल्याचे आपणास पहावयास मिळाले आहे. रत्नागिरीत तर एकाच मतदार संघातील दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा जल्लोष करण्यात आला.

पोलिसांनी तिथं आचारसंहितेचा गुन्हा दाखल केला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीचे महेश लांडगे आणि अपक्ष विलास लांडे यांच्यात लढत झाली आहे. महेश लांडगे यांचे पारडे जड असल्याचे सुरूवातीपासुनच पहावयास मिळाले मात्र प्रत्यक्ष निकाल लागल्यापुर्वीच अभिनंदनाचे फलक लागल्याने आणि त्यावर पर्मनंट आमदार असा उल्लेख करण्यात आल्याने याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Visit : Policenama.com