भुलेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी योग्य नियोजन : तहसीलदार अतुल म्हेत्रे

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – भुलेश्वर हे पुण्याजवळील प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भुलेश्वरची यात्रा मोठ्या उत्साहात भरते.

या नियोजनासाठी भुलेश्वर मंदिर येथे पुरंदरचे तहसीलदार अतुल म्हेत्रे, जेजुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, भारतीय पुरातत्व विभागाचे शैलेंद्र कांबळे,भुलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण यादव,सरपंच महादेव बोरावके आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी बोलताना तहसीलदार अतुल म्हेत्रे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना नियोजना संदर्भात सूचना केल्या व तयारीचा आढावा घेतला. तसचे येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही. त्यांना समाधान वाटेल याची काळजी सर्वांनी घ्यायची असे सांगितले.

यावेळी महादेवाची आरती तहसीलदार अतुल म्हेत्रे, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने, पुरातत्व विभागाचे शैलेंद्र कांबळे, भारत भिसे, सतीश काशीद, चंद्रकांत चौंडकर यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी उपसरपंच मोहन यादव, हभप लक्ष्मण महाराज यादव, उध्दव यादव, ग्रामपंचायत सदस्य माऊली यादव, राजेंद्र गद्रे, रुपाली गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय यादव, मामासाहेब गायकवाड, विनय गुरव, पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय