पोलिस भरती परिक्षेत ‘डमी’ उमेदवाराच्या कानात अडकलं ‘ब्ल्यू टुथ’ डिवाइस, करावं लागलं ‘ऑपरेशन’

पटना : वृत्तसंस्था – बिहार पोलीस, रिझर्व वाहिनी, बिहार राज्य औद्योगिक सुरक्षा वाहिनी, बीएमपीकडून खास इंडिया रिझर्व वाहिनीमध्ये कॉन्सटेबलच्या 11,880 पदांसाठी रविवारी पहिल्या टप्प्यातील लेखी परीक्षा झाली. दोन्ही शिफ्टमध्ये एकूण 80 टक्क्यांहून अधिक उमेदवार सहभागी झाले होते. पूर्ण बिहारमध्ये जवळपास 13 उमेदवारांना कॉपी करताना पकडण्यात आलं. प्रत्येक शिफ्टमध्ये राज्यभरात 550 केंद्रांवर 3,34,800 उमेदवार सहभागी होणार होते. मोतीहारीच्या परीक्षा केंद्रावर दुसऱ्याच्या जागी एकाला डमी म्हणून परीक्षा देताना पकडण्यात आलं.

कानात अडकलं ब्लूटूथ डिव्हाईस, करावं लागणार ऑपरेशन
मुजफ्फरपूरमध्ये कॉन्स्टेबल भरती दरम्यान ब्लूटूथने कॉपी करताना दुल्हिन बाजारचा धनंजय कुमार पकडला गेला. त्याला मिठनपुरा ठाण्याच्या हवाली करण्यात आलं. कॉपी करताना त्याच्या कानातच ब्लूटूथ अडकलं.

यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करूनच ब्लूटूथ डिव्हाईस काढलं जाऊ शकतं. धनंजय कानाला ब्लूटूथ लावून चिटींग करत होता. त्याचवेळी एका शिक्षकाची त्याच्यावर नजर पडली. त्याचवेळी त्यांना पाहून धनंजयने कानात ब्लूटूथ लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ब्लूटूथ आणखी कानात गेलं. यानंतर शिक्षकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. दोन लाखात धनंजयने डमी म्हणून जाण्यासाठी सेटींग केली होती.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

Advt.