नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – मानवत येथील नगर पालिकेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी काल रविवारी २३ रोजी शांततेत मतदान पार पडले ५८.८५% मतदारांनी मतदान केले.
एकुण २६ हजार १५७ मतदारांपैकी १५ हजार ३९५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात ८ हजार २९९ पुरुष तर ७ हजार ९६ स्री मतदारांनी सहभाग नोंदविला.

सोमवार, २५ जुन रोजी मानवत तहसील येथे मतमोजणीला सुरूवात झाली. यात सुरुवाती पासूनच भाजपने आघाडी कायम ठेवली

यात भाजपचे उमेदवार प्रा.एस.एन.पाटिल यांनी १२ हजार २१० मते मते घेऊन काँग्रेस उम्मेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला यात कॉग्रेस उमेदवार २७७१ अन्य एक अपक्ष २७३ मते मिळाली.

निकालानंतर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. हि निवडणूक येत्या विधानसभेची रंगीत तालीम समजली जात आहे मागील वेळी काँग्रेसचा किंचित मतांनी पराभव झाला होता, मात्र या वेळी मोठ्या संख्येने काँग्रेस उमेदवाराला पराभव पत्करावा लागला.