धमक्या देऊ नका, भाजपला ‘त्यांनी’ दिला इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चक्रव्यूहात अडकवले होते, तरीही ६३ आमदार त्यांनी निवडून आणले . आता आम्हीही गाफील नाही, जर कोणाला सत्तेचा माज असेल तर तो उतरवण्याची हिम्मत शिवबंधनात आहे. त्यामुळे आम्हाला धमक्या देण्याचा विचार करू नये, आमचंही ठरलयं असे म्हणत जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपला इशारा दिला आहे.

एका कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात होते, त्यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला शिवाय एकला चलो रे किंवा युतीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असेही स्पष्ट केले.

यावेळी सावंत म्हणाले कि शिवसैनिकांच्या माध्यमातून सहकारी पक्षांना आश्वासित करतो की, आम्हीही गाफील नाही . आमचही ठरलंय, आम्ही मागे राहणार नाहीत. धमक्या देण्याचा विचार करू नका . त्याची प्रचिती एका खासदाराच्या रूपाने दाखवली आहे. तसेच उस्मानाबादमध्ये ६ आमदार हे शिवसेनेचेच असतील असेही ते म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –