@नवी दिल्ली : ‘त्या’ बंगल्याची भाजपच्या मंत्र्यांना ‘धास्ती’

नवी दिल्ली : अंधश्रद्धेचा पगडा अजूनही कायम असल्याचा दाखला नवी दिल्लीत पुन्हा एकदा मिळाला आहे. सरकारी निवास्थानासाठी ‘कासावीस’ होणारे भाजपचे मंत्री मात्र ‘त्या’ दोन बंगल्यामुळे भयभीत झाले आहेत. परिणामी ‘त्या ‘ दोन बंगल्यावर वास्तुदोषाचा ‘ठपका ‘ठेवण्यात आल्याने ‘आम्हाला तो बंगला नको ‘ अशी नकारघंटा भाजपच्या मंत्र्यांकडून होत आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपले सरकारी निवासस्थान सोडले आहे ;पण या दोन्ही बंगल्यात राहण्यास भाजपचे एकही विद्यमान मंत्री राहण्यास तयार नाहीत, त्याचे एकमेव कारण म्हणजे या बंगल्यांमध्ये वास्तुदोष असल्याचे सांगितले जात आहे. या बंगल्यातील वास्तव्यामुळे जेटली व स्वराज यांची प्रकृती बिघडल्याचे तसेच त्यांना त्यांची महत्वाची पदे सोडावी लागल्याचे अजब उत्तरही ऐकावयास मिळत आहे.

या बंगल्यात जेटली राहावयास आले मात्र त्यांना प्रकृतीच्या अनेक तक्रारी भेडसावल्या. त्याआधी या बंगल्यात वास्तव्यास असणारे काँग्रेस नेते व माजी मंत्री सुखराम हे टेलिकॉम घोटाळ्यात अडकले. तसेच माजी केंद्रीयमंत्री मुलायमसिंग यादव हेही या बंगल्यात राहण्यास होते. त्यांनाही प्रकृतीच्या समस्या भेडसावल्या. सुषमा स्वराज या सी -७ या बंगल्यात वास्तव्यास होत्या ; पण बंगल्यात वास्तुदोष असल्यानेच त्या आजारी पडायच्या अशी अजब चर्चा याबंगल्यांबाबत होत असल्याने ‘तो’ बंगला नको रे बाबा … असा सूर भाजपचे मंत्री आळवत आहेत.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप