Video : बाळासाहेब ठाकरेंसारखं रिमोट कंट्रोलने काम करतोय ; भाजपच्या ‘या’ उमेदवाराचा अजब दावा

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) – लोकसभा निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना काही उमेदवार टीका-टिप्पणीबरोबरच अजब-गजब दावे करताना दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोलने सरकार चालवंत होते तस आम्ही देखील खासदार म्हणून काम करणार असा दावा लातूर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी केला आहे. लातूर येथील एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षातील व्यासपीठावरील नेत्यांनी त्याला हसून दाद दिली.

बाळासाहेब ठाकरेंसारखं रिमोट कंट्रोलने काम करतोय : भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारे

बाळासाहेब ठाकरेंसारखं रिमोट कंट्रोलने काम करतोय : भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारे

Geplaatst door Policenama op Zondag 14 april 2019

सुधाकर शृंगारे म्हणाले की ,’माझ्याकडे ६५०० लोक काम करत आहेत. जिल्हा परिषदेत न जाता मी जिल्हा परिषदेतील काम केलं. जस बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोल न सरकार चालावंत होते तसंच आम्हीदेखील खासदार म्हणून काम करणार आहे.’

त्यांच्या या विधानावर व्यासपीठावरील उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र त्यांनी केलेल्या या अजब वक्त्यव्यामुळे रिमोट कंट्रोलने जिल्हा चालवणारा खासदार लातूरची जनता निवडून देणार का असा सवाल उपस्थित होत आहे. असे खासदार जर संसदेत गेले तर लातूरचा ते बंटाधार केल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. एकीकडे शृंगारे यांना तिकीट मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागल्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्या या अजब दाव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात लातूरचे विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना भाजपनं तिकीट नाकारलं आहे. त्यांच्याऐवजी भाजपनं सुधाकर शृंगारे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. ते लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like