home page top 1

भाजप नगरसेवकावर गोळीबार करणारे दोघे अटकेत ; गावठी पिस्तुल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे भाजपा नगरसेवक जिकी उर्फ विशाल खंडेलवाल यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना आज सोमवारी देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. तर गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल जप्त केले आहे.

साबीर समीर शेख (19, रा. राठी तळेगांव) आणि जॉनी उर्फ साईतेज शिवा चिंतामल्ला (19 राठी ओर्डनन्स फॅक्टरी वसाहत देहूरोड) या दोघांना अटक केली आहे.

देहूरोड बाजारपेठ मध्ये नगरसेवक खंडेलवाल यांच्यावर अनोळखी दोघानी फायरिंग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या बाबत 307, ipc 4,25 आर्म ऍक्टनुसार गुन्हा नोंद आहे.

गुरुवारी सांयकाळी देहूरोड कॅम्पमध्ये हा गुन्हा घडला होता. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिस आणि गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. युध्द पातळीवर तपास सुरु होता. घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले.

सोमवारी देहूरोड पोलिसांनी साबीर समीर शेख आणि जॉनी उर्फ साईतेज शिवा चिंतामल्ला या दोघांना अटक करुन गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल जप्त केली. गोळीबार करण्याचा हेतू व इतर बाबी अद्याप समजू शकल्या नसून पोलिस तपास करीत आहोत.

आरोग्य विषयक वृत्त-
अहमदनगर ब्रेकिंग : खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मनपा स्थायी समितीच्या सभापतीला अटक
लोकसभेत भाजप खा. प्रज्ञा ठाकूर यांनी ‘संस्कृत’मध्ये घेतली शपथ, मात्र ‘या’मुळे उडाला ‘गोंधळ’
खुशखबर ! १ जुलैपासुन SBI चे ‘होम’ लोन स्वस्त, जाणून घ्या

Loading...
You might also like