मोहाळ्यात तणाव ; भाजप कार्यकर्त्याची हत्या

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – अकोट तालुक्यातील मोहाळा येथे भाजप कार्यकर्त्यावर एकाने हल्ला करुन त्याची हत्या केली. या घटनेने गावात तणाव निर्माण झाली असून राज्य राखीव पोलीस दलाची फौज तैनात करण्यात आली आहे. मतीन पटेल असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याचा साथीदार या घटनेत जखमी झाला आहे.

मोहाळा येथील मतीन पटेल यांच्या घरावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. त्यात एकाने मतीन पटेल यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये मतीन पटेल हे घटनास्थळीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेची गावात माहिती मिळताच तणाव निर्माण होऊन दोन गट आमने सामने आले होते. अकोट ग्रामीण पोलिसांनी वेळीच घटनास्थळावर धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात तणावपूर्ण शांतता असून एसआरपीएफ तैनात करण्यात आली आहे.