BJS मध्ये निर्भय कन्या अभियान संपन्न

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व भारतीय जैन संघटना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यक्रम बुधवारी (दि . २६) महाविद्यालयामध्ये पार पडला.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मिशिगन अमेरिका येथील सॅम्यूअल लुईस यांनी समाजातील समस्या, हवेलीच्या डीवायएसपी सई भोरे पाटील यांनी महिला सबलीकरण या विषयावर तर मंगेश पोळ, शामल थोरात यांनी देखील स्वसंरक्षणाबाबत प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. लुईस म्हणाले कि, मुलींना स्पर्शातील फरक समजला पाहिजे चांगला स्पर्श व वाईट स्पर्श असतो हे जाणून घेतले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थिनींने न घाबरता अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे.

भोरे पाटील म्हणाल्या कि, अन्याय होत असेल तर मुलींनी पुढे आले पाहिजे व निडरपणे पोलिसांची मदत घेतली पाहिजे, अन्यथा अन्याय करणाऱ्यांचा आत्मविश्वास बळावेल व ते समाजासाठी योग्य होणार नाही. यावेळी प्राचार्य अशोक गिरी, एस. व्ही.गायकवाड,  आर. ए. गायकवाड, बी. जी. फडतरे, निखिल आगळे व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.