पहिल्यांदाच ‘ब्लॅक होल’चं छायाचित्र जगासमोर

वृत्तसंस्था – ब्रह्मांडातील सर्वात शक्तीशाली म्हणून प्रसिद्ध असलेला सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलचे (कृष्ण विवर) छायाचित्र पहिल्यांदा जगासमोर आल्याचं संशोधकांनी प्रसिध्द केलंय. या छायाचित्रात कृष्णविवरामधून गॅस आणि प्लाजमा यांचा निघणारा नारंगी रंग दिसत आहे.

ब्लॅक होलची प्रतिमा घेण्यासाठी हवाई, अ‍ॅरिझोना, स्पेन, मेक्सिको, चिली आणि दक्षिण ध्रुव या सहा ठिकाणी इव्हेंट होरायझन टेलिस्कोप लावले गेले. हा ब्लॅक होल ‘एम-87’ या आकाशगंगेमधील 53.5 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असून हा ब्लॅक होल पृथ्वी पेक्षा तीस लाख पटीने मोठा असलेल्या या महाकाय विशाल ब्लॅक होलचं (कृष्णविवर) छायाचित्र असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

ब्लॅक होल काय आहे ?

ब्लॅक होल मुळात एक खगोलीय शक्तीच आहे. तारे अर्थात सूर्य नष्ट झाल्यानंतर अंतराळात फक्त एक गुरुत्वाकर्षणाचा बिंदू शिल्लक राहतो. या बिंदूची ताकद नंतर इतकी वाढत जाते की आपल्या वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट गिळंकृत असते. तीही अशी की गिळंकृत केल्या जाणाऱ्या गोष्टीचा, ग्रह, तारे, धूमकेतूंचा नामोल्लेखही राहत नाही. त्यालाच ब्लॅक होल असे म्हटले जाते.