सर्वात महागडा विलन प्राण यांनी ‘या’ चित्रपटासाठी घेतलं फक्‍त १ रुपये ‘मानधन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये दमदार खलनायकाची भूमिका साकारणारे सगळ्यात लोकप्रिय अभिनेता प्राण यांची आज पुण्यतिथी आहे. प्राण भलेही आपल्यामध्ये नाही पण त्यांचा दमदार अभिनय आजही लोकांमध्ये जिवंत आहे. प्राण यांनी १९४० पासून ते १९९० पर्यंत खलनायकाची भूमिका साकारली होती. आपल्या करिअरमध्ये त्यांनी ३५० चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्राण त्यावेळी खलनायकाची भूमिका साकारणारे चांगले अभिनेता होते पण तुम्हाला माहित आहे का, की त्यांनी एका चित्रपटासाठी १ रुपये फि घेतली होती.

अभिनेता प्राण यांनी राज कपूर यांचा ‘बॉबी’ चित्रपट १ रुपये घेऊन साइन केला होता. याचे कारण खूपच मनोरंजक होते. राज कपूर यांचा चित्रपट ‘बॉबी’ मध्ये ऋषि कपूरच्या वडिलांच्या रोलसाठी प्राण यांना कास्ट केले होते पण प्राण त्यावेळी जास्त फी घेत होते आणि राज कपूर यांना तेवढी फी देणे शक्य नव्हते. चित्रपट ‘मेरा नाम जोकर’ फ्लॉप झाल्यानंतर त्यामुळे राज कपूर यांची आर्थिक परिस्थिती ठिक नव्हती. अशामध्ये प्राण हे ‘बॉबी’ चित्रपटासाठी १ रुपयात काम करण्यासाठी तयार झाले होते.

जाणून घेऊया प्राण यांचे अनोखे किस्से

१. प्राण यांनी आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरबद्दल आपल्या वडिलांना सांगितले नव्हते.

२. प्राण हे राजेश खन्नानंतर सगळ्यात जास्त कमाई करणारा अभिनेता होता.

३. प्रकाश मेहरा यांचा ‘जंजीर’ चित्रपटाला देव आनंद, राज कुमार आणि धर्मेंद्र यांनी रिजेक्ट केले होते तेव्हा प्राण यांनी अमिताभ बच्चन यांचे नाव सुचविले होते.

४. मुंबई येण्याआधी प्राण यांनी २२ चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती.

५. भारत-पाकीस्तान विभाजन दरम्यान प्राण यांनी सर्वात मौल्यवान गोष्ट गमावली होती. ती म्हणजे त्यांच्या गोंडस कुत्रा होता.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

You might also like