अभिनेत्री जन्नत जुबेर ‘या’ 22 वर्षीय क्रिकेटरवर ‘फिदा’, नाव वाचून ‘चकित’ व्हाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जन्नत जुबेर रहमानी अशी टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आहे जी खूप सुंदर आणि प्रसिद्ध आहेत. जन्नतनं खूपच कमी वेळेत लोकप्रियता मिळवली आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच जन्नतनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. आज जन्नतला सगळेच ओळखतात.

जन्नत आज एक मोठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकतीच जन्नत एका मुलाखतीत बोलत होती तेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आला की, तुला टीम इंडियातील कोणता क्रिकेटर जास्त आवडतो. तेव्हा तिनं एका 22 वर्षीय क्रिकेटरचं नाव घेतलं कदाचित ते नाव ऐकून तुम्हीही चकित व्हाल.

जन्नत जुबेरनं सांगितलं की, टीम इंडियातील 22 वर्षीय विकेटकीपर आणि बॅट्समन ऋषभ पंत तिला सर्वात जास्त आवडतो. मुलाखतीत बोलताना तिनं ऋषभचं खूप कौतुक केलं. तिला तो खूपच आवडतो. तिला त्याच्या सोबत लग्न करायचं आहे. जन्नत सांगते की, ती ऋषभची खूप मोठी फॅन आहे. त्याच्यामुळे ती क्रिकेट मॅच पाहते असंही तिनं सांगितलं.

ऋषभ पंतबद्दल बोलायचं झालं तर सध्या तो टीममध्ये आपली जागा बनवण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. येणाऱ्या काळातील विकेटकीपर आणि फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –