home page top 1

…म्हणून ! ती स्वत:बद्दल ‘Google’वर सर्च करत नाही : अदिती राव हैदरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या हिंदी चित्रपटातून गायब झाली आहे. अदितीने ‘दिल्ली ६’ या चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केले आहे. ती सध्या दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे. आदितीने २०१८ मध्ये ‘दासदेव’ चित्रपटानंतर हिंदीमध्ये काम करणे सोडून दिले. ती कधीच स्वतःविषयी गुललवर शोध घेत नाही. याचा खुलासा तिने स्वतः केला आहे.

याबाबत आदितीने सांगितले, ‘एकदा गुगलवर माझ्या नावाने सर्च केले असता असे काही फोटो दिसले की तेव्हापासून मी स्वतःविषयी गुगलवर सर्च करणे सोडून दिले.’ अदितीने ‘ये साली जिंदगी’ या चित्रपटाकरिता बॅकलेस फोटोशुट केले होते. तिचे म्हणणे आहे की, गुगलवर फोटोशुट केलेले बॅकलेस फोटो पहायला मिळतात. त्यामुळे मी स्वतः ला गुगलवर सर्च करण्याचे बंद केले.

बॉलिवूडमध्ये अदितीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘भूमी’, रॉकस्टार’, ‘मर्डर ३’, ‘दिल्ली ६’ आणि ‘दासदेव’ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती आता दक्षिणात्य चित्रपटामध्ये काम करण्यास उत्सुक आहे. त्याचबरोबर दक्षिणात्य चित्रपटांना ती प्राधान्य देत आहे.

Loading...
You might also like