…तर सेलिब्रिटींकडून असाही बाँड लिहून घ्यावा लागेल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – 2005 साली घडलेल्या एका घटनेने नव्या मोहिमेला जन्म दिला. ही घटना म्हणजे अ‍ॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मीची कहाणी. तिच्यावर मेघना गुलजार या संवेदनशील तरुण दिग्दर्शिकेने ‘छपाक’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणला. त्यातील लक्ष्मीची भूमिका दीपिका पदुकोण या अभिनेत्रीने केली आहे.

एकतर्फी प्रेमातून महिलांवर पुरुषी मनोवृत्तीतून होणाऱ्या हल्ल्याच्या टप्प्यावरील एक महत्वाच्या टप्प्यावर हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटाच्या यशाअपयशाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी तो महिलांवरील अत्याचारांच्या घटनेवर वाचा फोडणाऱ्या या चित्रपटातून मोठी जनजागृती समाजात होण्याची शक्यता आहे. एरवी कोणी महिलांविषयी काही बोलले तरी समस्त महिला जगताचा अपमान करा, म्हणून अनेक उजव्या संघटना देशभर गोंधळ घालत असतात. त्यावेळी त्यांना खरंच महिलांविषयी आपुलकी आहे. कळकळ आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार कमी व्हावे, अशी त्यांची इच्छा असल्याचे वाटते. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी झारखंड निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नसताना नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी उच्चारलेले वाक्य सांगितले. त्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत गोंधळ घालून ती बंद पाडली. तेव्हा त्यांना महिलांविषयी किती कळकळ आहे, असे वाटले. महिलांचा प्रश्न चित्रपटातून मांडणाऱ्या छपाक या चित्रपटाला अशा सर्व महिलांविषयी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटनांचा पाठिंबा मिळेल असे वाटले होते.

पण, यातील प्रमुख भूमिका करणारी दीपिका आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जात होती. आपला चित्रपट पहावा, याचे आवाहन करत होती. इथंपर्यंत सर्व काही ठीक होते.
इतरांप्रमाणेच ती ‘जेएनयु’ मध्ये गेली. तेथील विद्यार्थ्यांना भेटली याचे वृत्त बाहेर पडताच देशात भुकंप झाला. महिलांविषयी कळवळा व्यक्त करणाऱ्या या केंद्रीय मंत्र्यांनी थेट तिला देशद्रोहीच ठरवून टाकले. ती कोणाला भेटते, म्हणून तिच्यावर टिका करायला सुरुवात केली.

ती जेएनयु मध्ये गेली म्हणजे जणू काही तिने शस्त्रु राष्ट्राशी संधान बांधले अशा प्रकारे तिच्यावर टिका होऊ लागली. तथाकथीत व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरुन ‘छपाक’वर बहिस्कार टाकण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली. काहींनी आपण तिकीटे परत केल्याचे सांगत थेट तिकीटे व्हायरल केली. तेव्हा देशभरातील शेकडो जण बडोद्यातील एका थिएटरमधील सायंकाळच्या एकाच शोमध्ये केवळ तीन खुर्च्यांवर बसून हा चित्रपट पाहणार होते, असे त्यातून दिसून आले. त्याचवेळी प्रत्यक्ष घटनेत मुस्लिम तरुणाने लक्ष्मीवर अ‍ॅसिड फेकले असताना चित्रपटात हिंदु तरुणाने अ‍ॅसिड फेकले असल्याचा अत्यंत हीन दर्जाचा आरोपही जाणीवपूर्वक करण्यात ही उजव्या विचारसरणीच्या लोकांनी करुन त्यांच्या व्हाटसअ‍ॅप युनिव्हर्सिटीमार्फत ते संदेश देशभर पसरविले. प्रत्यक्षात तसे काहीही नव्हते.

चित्रपट हा अतिशय संवेदनशील असल्याचे व उत्कृष्ट निर्मिती असल्याचे रिर्व्ह प्रसिद्ध झाले. मात्र, हजारो लोकांची मने तोपर्यंत कलुषित करण्यात ही लोकं यशस्वी झाली आहेत. त्यामुळे एखाद्या विचारसरणीच्या अति आहारी जाऊन अनेक जण एका चांगल्या कलाकृतीच्या आनंदाला मुकणार आहेत.
दीपिका प्रकरणावरुन आता एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. चित्रपट बनविण्यासाठी निर्मात्यांनी कोट्यावधी रुपये पणाला लावलेले असतात. पण, अशा चित्रपटबाह्य गोष्टीवरुन त्याला मोठे व्यावसायिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि हे प्रमाण आता खूप वाढू लागले आहे.

आज दीपिकाने केवळ जेएनयुच्या विद्यार्थ्यांना जाणून भेटली. हे निमित्त झाले. उद्या या कलाकाराने मशिदीला भेट दिली मंदिराला नाही, असे म्हणून त्याच्यावर बहिस्कार टाकण्याची भाषा केली जाऊ शकते. अभिनेते हे पडद्यावर दिसत असल्याने त्यांच्या मताला अकारण महत्व दिले जाते. त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जातात. त्याचा परिणाम निर्मात्यांवर होत असतो.

त्यापूर्वी निर्माते दिग्दर्शक कलाकारांशी करार करताना आर्थिक मोबदल्याबरोबर कथेची माहिती कोणाला देऊ नये, अशी अट घालत होते. आता त्यांना या करारात अनेक गोष्टींचा समावेश करावा लागणार आहे. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत कलाकाराने काय बोलावे, काय बोलू नये, कोणाला भेटावे, कोठे जावे, याविषयीचाही समावेश निर्मात्यांना त्यांच्या करारनाम्यात समावेश करावा लागेल.

कलाकारांनी कोठे जावे व काय बोलावे हे त्यांचे स्वातंत्र्य आहे आणि आपण त्यांना तेथे दिले पाहिजे. दीपिकाने कोठे जावे अथवा जाऊ नये, हे ठरविण्याचा अधिकार अन्य कोणाला दिलेला नाही. पण, प्रत्यक्ष गोष्टीकडे राजकीय पक्षाचा चष्मा लावून पाहणाऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. जणू एखाद्या ठिकाणी कोणी उपस्थित राहिले तर त्याने शत्रुशी हातमिळवणी केल्याचा भास त्यांना आता होऊ लागला आहे. ही भयावह स्थिती देशात निर्माण झाली आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !