‘KING’ खानसोबत काम केलेल्या ‘त्या’ १४ अभिनेत्री झाल्या ‘गायब’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध किंग खानसोबत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आज बॉलिवूडमध्ये आपले नाव गाजवत आहे. या अभिनेत्रींसाठी शाहरुख खान लकी ठरला पण अशा काही अभिनेत्री आहेत. ज्यांनी शाहरुखसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले पण त्यांच्यासाठी शाहरुख खान लकी ठरला नाही. कोण आहे या अभिनेत्री जाणून घेऊया…..

मराठी सिने आणि टिव्ही इंडस्ट्रीमध्ये बहुचर्चित असणारी जोडी म्हणजे सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी श्रिया हीने शाहरुखच्या ‘फॅन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नाही. त्यानंतर श्रिया बॉलिवूडमधून गायब झाली. काही दिवसांपूर्वी श्रिया अमेझॉनची सुपरहिट वेब सीरिज मिर्जापूरच्या पहिल्या सीझनमध्ये दिली.

१९९७ मध्ये ‘परदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी महिमा चौधरीला या चित्रपटाने ओळख निर्माण करुन दिली. त्यानंतर तिने ‘दिल क्या करे’, ‘धडकन’, ‘खिलाडी ४२०’ या चित्रपटात काम केले. जवळपास १० चित्रपटांमध्ये मुख्य भुमिकेत असलेली महिमाचे बॉक्स ऑफीसवर चित्रपट फ्लॉप झाले.

View this post on Instagram

Sunny 😎 sunday #sunday #sunshine #yellow #smile

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1) on

२०१७ मध्ये शाहरुखचा बिग बजेट सिनेमा ‘रईस’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री माहिरा खानने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, भारत-पाकीस्तानच्या तणावग्रस्त संबंधामुळे पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली. यासोबत माहिराचे करिअर थांबले.

२०१४ मद्ये आलेला ‘स्वदेस’ या एकमेव सिनेमात काम करणारी गायत्री जोशी या सिनेमानंतर विकास ऑबरॉयशी लग्न केले. आणि त्यानंतर तिने आपल्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी बॉलिवूडला अलविदा केले.

१९९४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सुचित्रा कृष्णमूर्तीने आपल्या काही अटींसोबत बॉलिवूडला अलविदा केले.

२००७ मध्ये आलेला सिनेमा ‘चक दे इंडिया’ जवळपास १० अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले . त्यातल्या ठराविक अभिनेत्री जशा आल्या तश्याच गायब झाल्या. या सिनेमात तान्या अबरोल, आर्या मेमन, अनायथा नायर, शुभी मेहता, चित्राशी रावत, किम लालद्वाला, मेसोचोन जिमिक या अभिनेत्रींनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केला. मात्र, चित्रपटानंतर त्या गायब झाल्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like